NIA is probing the man wearing a PPE is Sachin Waze or not
NIA is probing the man wearing a PPE is Sachin Waze or not

पीपीई कीटमधील 'ती' व्यक्ती सचिन वाझे? 'एनआयए'कडून तपास सुरू

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. एनआयआय न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात एनआयएकडून ही घटना घडल्यापासून वाझे यांच्या प्रत्येक हालचालींबाबत माहिती घेतली जात आहे. 

अंबानी यांच्या मुंबईतील "अँटिलिया' निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. वाझे या प्रकरणात तपास करत होते. कार ज्या रात्री अंबानी यांच्या घराबाहेर उभी करण्यात आली त्यावेळी एक व्यक्ती पीपीई कीटमध्ये परिसरात फिरताना आढळून आली आहे. ही व्यक्ती कोण आहे, याबाबत एनआयएकडून तपास केला जात आहे.

पीपीईमधील व्यक्ती सचिन वाझे तर नाहीत ना, याचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी एनआयएकडून वाझे यांच्या त्यावेळीच्या उपस्थितीबाबत माहिती घेतली जात आहे. ठिकठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. त्यामुळे वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. त्या पथकामध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने घटनेला गंभीर वळण लागले. मनसुख यांच्या पत्नीने वाझे हेच पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली असून, त्यांनी वाझे यांचा जबाबही नोंदवला. 

स्फोटकांबाबत एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने, त्यांनी वाझे यांना चौकशीसाठी बोलावले. वाझे यांनी यापूर्वीच ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. एनआयएने त्यांच्याकडे अनेक चौकशी केल्यानंतर अटक केली. 

वाझेंच्या व्हॉट्‌सऍप स्टेट्‌सने खळबळ

सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते. त्यात त्यांनी जग सोडण्याची भाषा केली होती. 3 मार्च 2004 ला सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्षे होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्षे आहेत ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे वाझे यांनी म्हटले होते.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com