एमपीएससी परीक्षार्थींची व्यथा : अकरा महिन्यांत सहावेळा परीक्षा गेली लांबणीवर

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
MPSC pre examination scheduled for march 14 has been postponed
MPSC pre examination scheduled for march 14 has been postponed

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. या परीक्षेची जाहिरात डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार ५ एप्रिलला परीक्षा नियोजित होती. पण कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल सहावेळी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ डिसेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिध्द केली होती. आयोगाकडून  १५ पदांसाठी २०० जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जाहिरातीनुसार दि. ५ एप्रिल रोजी परीक्षा होणार होती. पण त्याच काळात कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सुधारित वेळापत्रकानुसार २६ एप्रिल रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. पण देशातील कोरोना कहर कमी न झाल्याने लॉकडाऊन सुरूच ठेवण्यात आला. परिणामी आयोगाने ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. कोरोनामुळे विद्यार्थीही आपल्या घरी परतले होते. त्यामुळे तारखा पुढे गेल्याने अजिबात विरोध झाला नाही. कालांतराने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत गेल्यानंतर आयोगाने १३ सप्टेंबर ही तारीख जाहीर केली. 

विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. पण पुन्हा विद्यार्थ्यांना पुन्हा धक्का बसला. आयोगाने ही तारीखही पुढे ढकलून २० सप्टेंबर ही तारीख देण्यात आली. तेव्हाही विद्यार्थी शांत राहिले. पण परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यामध्ये आयोगाने यावेळीही कसर ठेवली नाही. ही तारीख ११ अॉक्टोबर करण्यात आली. पण पुन्हा परीक्षेच्या आदल्यादिवशीच विद्यार्थ्यांना झटका देण्यात आला. 

आता ही परीक्षा १४ मार्च रोजी होईल, असे आयोगाने जाहीर केले. परीक्षा दोन दिवसांवर आलेली असतानाच आयोगाने ही तारीखही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. यापार्श्वभूमीवर ही परीक्षा घेणे योग्य नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

दरम्यान, आयोगाच्या या घोषणेनंतर पुण्यातील नवी पेठ परिसरामध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत याचा निषेध केला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झाले होते.  

राज्यसेवा पूर्व परीक्षेची ''तारीख पे तारीख''

जाहिरात प्रसिध्द - २३ डिसेंबर २०१९ रोजी 
नियोजित पहिली परीक्षा - ५ एप्रिल
पुढे ढकलली - २६ एप्रिल, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ११ अॉक्टोबर, १४ मार्च 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com