कर्जमाफीबाबतच्या सरकारी आदेशाची उद्या राज्यभर होळी - डॉ. नवले

कर्जमाफीबाबतच्या सरकारी आदेशाची उद्या राज्यभर होळी - डॉ. नवले

नगर : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकित सरकारच्या वतीने कर्जमाफीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये अनेक अटी व मर्यादा लादण्यात आल्याने सुकाणू समितीने हा प्रस्ताव नाकारला आहे. संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्जमाफी व्हावी, अशी मागणी समितीने केली असून, बुधवारी राज्यभर या आदेशाची होळी करण्यात येणार असल्याचे सुकाणू समितीचे संयोजक  अजित नवले यांनी सांगितले. 

निकष समिती समोर कर्जमाफीसाठी निकष व अटी असलेला प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला. प्रस्तावानुसार सरकार शेतक-यांचे एक लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफी करेल. 30 जून 2016 पर्यंत थकीत असणा-या शेतक-यांचाच या कर्ज माफीसाठी विचार होईल. दहा हजाराच्या कर्जासाठी ठेवण्यात आलेल्या बहुतांश जाचक अटीमध्ये असे कर्जदार बसत असतील, तरच त्यांची कर्ज माफ होतील. नियमित कर्ज भरणा-या व उसनवारी करून केवळ व्याज भरून नवेजुने करणा-यांचा कर्जमाफीत समावेश नसेल. 2017 मध्ये कर्ज घेतलेल्या नियमित कर्जदारांना कर्जमाफी दिली जाणार नाही. अशा नियमित कर्जदारांना कालांतराने कर्ज फेडण्यासाठी प्रोत्साहन योजना देण्यात येईल व त्यांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येईल अशा प्रकारच्या अटी व मर्यादा असलेला प्रस्ताव मंत्री गटाने मान्यतेसाठी निकष समिती समोर ठेवला होता. अशा निकषांच्या अधीन राहून दिलेल्या या कर्जमाफीमुळे बहुतांश शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार होते. सुकाणू समितीने हे वास्तव लक्षात घेता सरकारचा कर्जमाफीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. 
शेतकऱ्यांच्या मागण्या 
संकटग्रस्त व गरजू शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्या व कर्जमाफीसाठी एक लाखाची मर्यादा मागे घ्या. संपूर्ण कर्ज माफ करा. 30जून 2017 पर्यंत कर्ज फेडू न शकणा-या थकीत बिगर थकीत सर्व कर्जदारांना कर्जमाफी द्या. कर्जासाठी जाचक अटी लावण्याचे कारस्थान थांबवा. नव्या हंगामासाठी सर्व शेतक-यांना पुरेसे नवे कर्ज तातडीने उपलब्ध करून द्या, या मागण्या यावेळी सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com